नमन शूरवीरा ✍️

 |नमन शूरवीरा|

    ( नेताजी सुभाषचंद्र बोस  )


काळ गुलामीत फिरंग्यांचा 
लढत होते वीर 
ओरिसात कटक गाव 
जन्मले पुत्र क्रांतीवीर... 

सुपुत्र जानकीनाथ यांचा 
प्रभावती पोटी जन्मले 
इंग्रज बोलले रायबहाद्दर 
नेताजी  क्रांतीपुरुष झाले... 

गांधीजीची पदवी  देशभक्त 
कांग्रेस अध्यक्षपद भूषवले 
मवाळ जहाल प्रवाह 
जहाल शस्र अवलंबिले.... 

इटलीत जाऊन मिळाले 
पाठींबा घेऊन आले 
आझाद हिंद स्थापिली 
इंग्रजास  ताकतीने घाबरविले... 

झेंडयाखाली तरूण आले 
आझादी पर्व आणिले 
तुम मुझे खुन दो 
मै तुम्हे आझादी दूंगा बोलले .. 

गांधीजींना राष्ट्रपिता म्हणाले 
महान क्रांतिकारी झाले 
नमन या शुर विरास 
जय हिंद आसमंत निनादले... 

 प्रदिप मनोहर पाटिल 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव  ©® 


Comments

  1. जय हिंद.खरी क्रांती जर कोणी घडवून आणली असेल तर ती आझाद हिंद सेनेने आणि नेताजी सुभाषचंद्र बाबू यांनी .आणि त्यांनी दिलेलामंत्र सदैव सैनिका पुढेच जायचे न मागती तुवा कधी फिरायचे.हा सगळ्यांनी सदैव लक्षात ठेवला पाहीजे

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद आपला आभारी आहे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे