विज्ञानाची ओळख ✍️
|| विज्ञानाची ओळख ||
कशी सांगु ओळख
ती तर आहे सर्वांना
शोधक असतात मुळात
नवीन दिसतं ज्यांना...
रहस्य दळलय काय
निसर्गात भूगर्भात आकाशात
उलगडा होत असतो
तेच विज्ञान शास्रात...
अणु रेणु इथे
अवाढव्य तारे आकाशात
भूमंडळात सारे त्यातुन
वेगळी निर्मिती संशोधनात...
भाग विभाग ज्ञानाचे
घेऊ धडे शास्राचे
प्रगती अफाट यातुन
कल्याण त्यात मानवाचे...
अंधश्रद्धा गाडली विज्ञानाने
जीव सुखावली यंत्राने
शोध अफाट लागले
वरदान ठरले शिकण्याने.....
प्रदीप मनोहर पाटिल
मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©®


Comments
Post a Comment