स्वीकारली मी कर्फ्यू
|| स्वीकारली मी कर्फ्यू ||
साऱ्या मानवजातीच्या कल्याणा
कर्तव्य बजावण्या साठी
जीवसृष्टी जगवण्या वाचवण्या
विषाणु संसर्ग टाळण्यासाठी....
महामारी घोंगावत येतेय
रोखु आहे तेथे
झाला संसर्ग मानवास
लागूनये थांबु आहे जेथे...
कोंडून घेऊ कुटूंबास
आव्वाहन झालं पाळू
दृष्ट कोरोना अवतरला
आहे तेथेच गाडु....
बंद करू सारं
सांभाळू आपलं घर
जगण्यात आहे सार
करू बंद दार....
मनापासून स्वीकारू कर्फ्यू
आज थांबलो भाऊ
उदया पळून मिळवु
महामारी लांब ठेऊ...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव ©®

Comments
Post a Comment