मायभूमी

|| मायभूमी ||

 सृष्टी दाखवली जिने 
पृथ्वीवर आलोय दैवाने 
मातीवर चालु लागलो 
इवल्या इवल्या पायाने...
 

नमन करतोय हाताने
संस्कृती जोपासली राज्यांनी 
झटले लढले मातीसाठी 
प्राण दिले  क्रांतीवीरांनी...

विविधतेने नटली सावरली 
जातीधर्मात छान वाढली 
मातृभूमी तिरंग्यात एकवटली 
चंद्र ताऱ्यांवर प्रकाशली....
 

वीर दिले भूमातेने 
रक्त घेतले शत्रूने 
रक्षिली भूमी मनगटाने 
पाहिले  शौर्य सूर्याने...
 

तेज भरले मातीत 
मातीत जन्मलेल्या प्रजेत 
राहताय आता मजेत 
फडकतोय तिरंगा तेजात....
 

त्या तेजानं घायाळ 
शत्रुवर करतोय मात 
ऊर्जा आलीय  सुपुत्रात 
भारत भूमी दिमाखात...
 

वर्णनास शब्द अपूर्ण 
नाही आठवत लेकरास
ग्रंथ  पडतील अपुरे
थाबण्या सांगतो लेखणीस....
 


प्रदीप मनोहर पाटिल 
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव  ©® 

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे