व्यथा बळीराजाची ✍️
|| व्यथा बळीराजाची ||
काय सांगु व्यथा
अपूर्ण पडतील गाथा
कष्ट दिनरात राहता
देऊन उरलेले खाता…
गाई म्हशी धुता
दुध लोकांना देता
बादली पाण्याने धुवुन
तेंच घरी नेता…
रात पहाट करता
ढेकळं सारी फोडता
रान हिरवं बघता
पिकवुन घरी नेता…
व्यापारी फुकट घेता
जीवनावश्यक वस्तु सांगता
सरकारी कवडीमोल किंमत
सारीच यांना फसवता…
सारी लुटारू लुटता
यांच्यावर पोट भरता
ओरबाळून यांना घेता
कोरडं नियमित खाता…
असतो दयायचा बळी
वरवर सारी गोंजारता
राजा यास बोलुन
हळुहळु घाव घालत मारता…
_________________________
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव ©®

छानच
ReplyDeleteछानच
ReplyDeleteछान सर
ReplyDeleteयोग्य वास्तव वर्णन
ReplyDelete