पाणी बचत
|| पाणी बचत ||
जल वाचवा सारे
नदीनाले जोडणी तंत्र
पिढीस शिल्लक ठेवा
ठिबक सिंचन मंत्र …
साठ्वण तलाव भरा
अडवा जिरवा कास धरा
पाण्या वाचुन धरा
तृप्त जीवास करा…
नदीस बांधु बंधारे
सांडपाणी शेतात नेऊ
पावसाचं जल साठवू
शोष खड्डे खोदत जाऊ…
पन्हाळाचं अंगणात जिरवा
बांध बंधिस्त ठेवु
शेताचे त्यातच जिरवू
शिवार जलयुक्त उभारू…
विहीर पुनर्भरण करा
शेतात करा तळे
मुबलक पिकास मिळे
फ़ुलूद्या सर्वांचे मळे…
पिकांना जपुन वापरा
वृक्ष जगवा वाढवा
सर्वदूर हिवराई करा
व्यवस्थित सारं साठवा…
______________________________________
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©®


Comments
Post a Comment