संत गाडगेबाबा - स्वच्छतेचे जनक

||संत गाडगेबाबा - स्वच्छतेचे जनक||


माणसातील संत जन्मले  
घाणीतून कमळ फुलवले
जनतेस आचरण शिकवले
  स्वछतेचे धडे गिरवले...

झाडू घेऊन हाती
गावं स्वच्छ होती
केर कचरा न राहती
निर्मळ मन पाहती...

खाऊनी आपली शिदोरी
घालवली मक्तेदारांची मुजोरी
लावीत सर्व गावांत हजेरी
केली बुवाबाजींवर शिरजोरी...

अंधश्रद्धेस पळताभुई  थोडी  
 लाविली जनतेस गोडी
दुर्गुण बाहेर काढी
दृष्ठांचे  लक्तरे ओढी...

मायेने समजवी गडी
वणवण करुनि  झाडी
असा संत न होई पृथ्वी वरी
शिकवणं घेऊ त्यांची थोडी...




प्रदीप पाटील
गणपुर. ता . चोपडा.
जिल्हा. जळगाव  ©®

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे