विजया दशमी (क्र 1) दसरा ✍️
||विजया दशमी||
रोवुन विजयी पताका
करून कर्तृत्वाने सोमोलंघन
पुजन शमी वृक्षाचं
करतं संस्कृती वंदन...
लुटून सोनं आपट्याचं
वाटु जन माणसात
घालु आनंदाची साद
मात करून संकटात...
जाळुन रावणी विचार
रुजवु सर्वात सदाचार
ठेवु तलवारीला धार
झेलु संकटांचे वार...
बळकट मन ढाल
आनंदात धरू ताल
सुखावोत आप्तेष्ट बाल
सोडु नैराश्य चाल...
मन भरारी आसमंती
विचारांची ठेवु श्रीमंती
सोनं पावलांची घरी लक्ष्मी
सुख शांती खरी श्रीमंती...



Chaan ahe
ReplyDelete