चित्रं काव्य ✍️
|| चित्रं काव्य ||
ओवी असे मुखात
सोबत ठेवुन परात
दळुन रुचकर भाकरी
मिळे साऱ्या घरात…
लावंण्य लक्ष्मी रूपात
सडा रांगोळी परसात
हास्य ठेवे कष्टात
दुःख साठवुन उरात…
सुख शांती निरोगी
आयुष्य सुखाचं कुटूंबास
सरस्वती नांदे लाभे
खाऊन सुखाचा घास…
तऱ्हाच निराळी पूर्वी
नसतं माणसे गर्वी
किती वर्णावी थोरवी
माय आमुच्या गौरवी…
चुलीवर सोसे चटके
गरिबासाठी जीव अटके
देईं आपल्यातुन त्यांना
पण असे नेमके.
____________________
प्रदिप मनोहर पाटिल
मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा


छानच
ReplyDelete