मी मराठी बोलतेय
मी मराठी बोलतेय
भाषा मी तर मी कशी बोलु शकते असं तुम्हाला वाटलं असेल माझ्या लेकरांना तुमी माझे लेकरचं आहात नं. तुमीच बोलता ना? माय मराठी असं ! म्हणुन लेकरं बोलले मी मला माहित आहे माझे लेकरं गुणी आहेत. मला वाढवण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी खुप लिहले बोलले माझ्या बद्धल ग्रंथ, पुस्तकं, कथा, कादंबरी , अभंग, पोवाडे, शाहिरी, नाटकं, बोलपट ( चित्रपट) इतकं साहित्य माझ्यावर माझ्यात झाले कि सर्वगुण संम्पन्न झाले मी... लावणी तर कुठच नाही माझ्यातचं बोलली जाते लावणी चे नाव घेतलं तर बघा तुमची कशी कळी खुलली ना? तुमची कळी खुलावी उत्साह यावा आयकतांना मुध्दाम लावणी विषय काढला.... बोर व्हायला नकोत तुमी. अधुन मधुन कीर्तनकार जसं चुटकुले सोडतं असतो तसं त्यांना माहित असते तुम्हाला चांगले उपदेशाचे डोस अभंगातून नीट पटणार नाहीत आयकून झोप यायला नको म्हणुन तसं मी लावणी सांगितली बरं बाळांनो...राजे महाराजे कवी संत साहित्यिक. खुप लिहलं मराठीत रुजवली वाढवली अलीकडे तर माझ्या साठी काही साहित्यिक तर मराठी साहित्य संमेलन पण विदेशात भरवुन आलेत. तेथे पण माझा प्रसार केला. तिथल्या लोकांना यावी समजावी माझी गोडी लागावी म्हणुन कितिरे आटापिटा करताय करत आलेय. आता हे लहान पोरग प्रदीप नावाचं बघा ना थोडं वेडं वाकडं ट ला ट म ला म जोडुन लिहतंय जणू खारीचा वाटा उचलत आहे अशीं याच्या सारखी खुप आहेत आता तर ... ज्ञानेश्वर तर सांगून गेले अमृताला हरवणार माझी माय.. माझं तर ऊर मन भरून येतं डोळ्यात आनंद अश्रू वाहतात कधी आठवणीत... तुमी चुकणार नाहीत गाड्यांवर सुद्धा नंबर माझा लिहता घरावर दुकानाच्या पाट्या घर शाळा उंच शिक्षण ठिकाणी पण मराठी बोलता लिहता.. तुमी मला मोठी मानता पण माझ्या बहिणी ईतर भाषा खुप आहेत जगात त्या पण शिका रे बाबांनो.. त्या आणि मी एकत्र नांदत असतोय एकमेकांना आम्ही समजुन घेतो तुमी पण समजुन घ्या... तुमी तर माझ्यात एक म्हण बोलतात नेहमी "माय मरो पण मावशी जगो" कारण तुम्हाला काहींना माय पेक्षा मावशी जास्त आवडते. मावशी सारं समजुन घेते. अरे बाळा माय ती मायचं असते.. माय चं बोलणं नाही मनावर घेऊ जे सांगते ते भल्या साठी ना? माझी मोठी बहीण अशीच मेली बिचारी मोडी नाव होतं तीच लहानांना माहित पण नसेल माझी मोठी बहीण एक वारली ते.अगदी अलीकडे इंग्रज काळात पण सरकारी दप्तरी नोद नोंदणी मोडी भाषेत केली जायची ती पण माझ्या इतकीच मोठी समृद्ध होती पण गेली बिचारी लोप पावली.. वारली नहीं रे तुमच्या पूर्वजांनी मारली तिला खुन केला तिचा.. तिला कोणी नाही समजुन घेतलं रे किती तळमळत होती बिचारी तिच्या यातना पाहिल्याय मी. ते दृश्य पाहुन अंगावर काटे उभे राहतात माझ्या भीती वाटते मला जर असे दिवस दाखवले माझ्या लेकरांनी तर कसं होईल माझं...तुम्ही जेव्हा ईतर माझ्या बहिणीचं कौतुक करतात ना तेव्हा मला तीच भीती वाटली वाटते म्हणुन मी तुमच्या शी बोलायला आले. जर का मेले मी मला माझ्या मरणाचं दुःख होणार नाही मला पण तुमी सुखी कसं होनार रं पोरा.. हि भीती वाटली म्हणुन बोललतेय माझी शिकवण इतकी वाईट नाही खात्री आहे मला मला कोणी मारू शकत नाही अंनत सारी सांभाळणारी पोरे असतांना सहज आज माझा दिवस साजरा करत आहात जसा माझा वाढदिवस वाटतोय मला..केक तर आणणार नाहीत माझी पोरं ते दृश्य मनात आले ना ते पाहुन थोडी मनात पाल चुकचुकली. मराठी लोकं कपाळावर गंध लावत औक्षण करून दिप ओवाळत... वाटलं मला बोलावं मनातलं मनात जे आलं तसं बोलले मी सुचलं तसं रागावू नका का रं माय आहे तुमची...तुमाला असंच सुख कायम पाहायला मिळो मला प्रार्थना करते मी देवा जवळ माझा संसार गुण्यागोवींदाने वाढो फुलो निरोगी राहो सारं माझं घर.. चला मुलांनो आज शुभ दिवशी मी पण ना काहीपण विचार करतेय. आणि तुमच्या शी बोलतेय इतका छान मराठी संसार सुरु असतांना.. काहीतरी गोड धोड बनवु आज...
प्रदीप मनोहर पाटिल
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.

अतिशय छान
ReplyDeleteधन्यवाद 👏
DeleteMast
ReplyDeleteMasttch
ReplyDeleteछानच 👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर्वांना 👏
ReplyDelete