घर (क्र 2)✍️
|| घर : 0२ ||
सत्य संस्कार घरात
मंदिर वास त्यात
सारे एकत्रित राहत
निर्मळ मन ज्यात…
साथ संगत एकमेकात
घेऊन हातात हात
एकीत करून मात
रममाण कुटुंब संसारात…
सडा रांगोळी अंगणात
आजी आजोबा घरात
आई वडील हृदयात
तुळशी दिवा लावी सांजवात…
आई वडील हृदयात
तुळशी दिवा लावी सांजवात…
जीव साऱ्यांचा एकदुसऱ्यात
आनंदी मुलं घरात
दंग गोष्टी आयकण्यात
जरी आईबाप रानात…
आनंदी मुलं घरात
दंग गोष्टी आयकण्यात
जरी आईबाप रानात…
सुख समृद्धी जीवनात
आरोग्य नांदे शरीरात
मान सन्मान जगात
पिकं डोले शेतात…
_______________________
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️

Nice poem
ReplyDeleteNice poem
ReplyDeleteNice poem
ReplyDeleteछान..प्रत्येकाच्या मनातले घर
ReplyDeleteस्वप्नतील घरटे खूप छान
ReplyDelete