श्रावण

 || श्रावण ||

ढग लागले बोलु 
धर्तीने नेसला शालू 
मनं लागलं खुलू 
फुले लागली डुलु...

रान लागलं फुलू 
डोंगर लागलेत पांझरू 
इंद्रधनू लागलं खुलू 
उडू लागले फुलपाखरू...
 
मध्य बिंदू ऋतूचा 
उत्साह साऱ्या जीवांचा 
पर्व येती देवांचे 
मनमोहक क्षण पाहण्याचा…
 
छटा अनंत क्षणात 
कधी राहतो उन्हात 
थोडं भिजतो पावसात 
असंच सारं श्रावणात…


प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता चोपडा ©️®️

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे