संस्कार आणि संस्कृती ✍️

|| संस्कार आणि संस्कृती ||


वय असतं लहान 
शिकवण मिळते छान 
आई वडील बाबा 
शिकवतात लहानथोरांचा  सन्मान…
 
कुटुंब शाळा परिसर 
गाव पुस्तकं गाथा 
यातुन मिळते ज्ञान 
टेकवत वडीलधाऱ्यांना माथा…
 
जगायचं वागायचं कसं 
यालाच म्हणतात संस्कार 
सत्यवादी आधित्मिक वागणुक  
 पाहुंन मन गार…
 
रूढी परम्परा पद्धती 
आचार विचार जीवनचाली 
जगण्याची  कृती संस्कृती
त्यात संस्कार दिसली…
 
 उत्तम करा  कृती 
जोडा  त्यातुन नाती 
अंगीकारु   त्यात नीती 
 छान येईल प्रचिती…

 
प्रदीप मनोहर पाटील 
मु. गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव 
©️®️

Comments


  1. खूपच सुंदर...
    संस्कार नि संस्कृती कवचकुंडले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे