गव्हाचं रान
|| गव्हाचं रान ||
(अवकाळी गारांचा पाऊस पडला )
रान होतं छान
भरत होतं मन
अवकाळी आला अचानक
केली रानात घाण.
भरत होतं मन
अवकाळी आला अचानक
केली रानात घाण.
खुशी गेली क्षणात
अविचार येतो मनात
तोंड दयायच जनात
सावकार येईल दारात.
पहिले कापसाचं गेलं
आता गव्हाचं नेलं
मन आमचं मेल
लेकरांनी काय केलं.
उच्च होती शेती
झाली तिची माती
भ्रष्ट मजा करती
व्यापारी वरून लुटती.
सरकार निघती करंटी
चोरांना तेच पोसती
पिकलेलं फुकटात घेती
वारे साऱ्यांच्या करामती.
कष्टाला कसं लागला
घामाला अश्रू फुटले
खालावते परिस्थिती प्रकृती
आम्हाला देवानेच लुटले.
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव
©️®️

छान लिहिलय सर
ReplyDelete