घर (क्र 1)
|| घर ||
विश्वची माझे घर
सुंदर आकाश प्रवेशद्वार
जमीन देते आधार
अन्न उचलतं भार…
हवा करते गार
पाणी जीवन सार
जीव सजीव फार
सृष्टी जगण्या आधार…
जन्म मिळाला उधार
निर्माण मातीतुन सारं
शरीर भासतं कणभर
ओझं वाटतं मणभर…
प्रपंच करावा सुंदर
कोण नेलंय वर
असलं छोटंसं घर
चित्त समाधान त्यावर…
नातं त्यात दृढ
आयुष्य असावं सदृढ
काढावं अवैध मार्गाने
संम्पत्ती जमवण्या खुळ…
जाणं निर्मिते आईवडिलांचे
ऋण फेडू भ्रम्हांडाचे
विचारत येतील जन
हेच घर का त्या महापुरुषाचे.
___________________________
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©®

Super
ReplyDelete