खरच स्वतंत्र झालो का?
|| खरच स्वतंत्र झालो का? ||
रोजच मरतात गुणीआयकत नाही कुणी
थकलेत हात राबुनी
संकट पावला गणी…
प्रश्न हजार पडूनी
दाद देत नाही कुणी
खेटा सरकार दरबारी
बसली ओरडून वाणी…
सांगतो छाती ताणुनी
रुजली लोकशाही मणी
भ्रष्ट कारभार आवासुनीं
घेतात गरिबाला ओरबाडूनी…
रक्त गेलं आटुनी
सापळा उरला त्यातुनी
सत्य चाललंय मरुनी
भ्रष्ट आलं उफ़ाळुनी…
कधी शंका मनात
राज्य कोणाचं चाललंय
कोणा साठी कारभार
कुठे लोकशाही प्रश्न पडलाय…
प्रदीप मनोहर पाटील
मु. गणपूर तालुका चोपडा
जिल्हा जळगाव
©®

Comments
Post a Comment