सुट्टी महामारीची
|| सुट्टी महामारीची ||
लावली कोरोनान हजेरी
सुरु झाली महामारी
माणसं घाबरली सारी
बसली घरो घरी...
सुरु झाली महामारी
माणसं घाबरली सारी
बसली घरो घरी...
शुकशुकाट भासला पृथ्वीवरी
बंद उधोग सारी
कामगारांना आली उपासमारी
थांबल्या लग्नाच्या पोरी...
गाठोडं घेऊन पाठीवरी
संसार घेऊन डोक्यावरी
रडताय पोरं खांद्यावरी
मरताय सारी कष्टकरी...
शेतकरी आहे बांधावरी
खायला मिळेल तरी
तो मेला जरी
पोसली जाईल दुनियासारी...
राजकारणी श्रीमंत मश्गुल
गरिबांची बत्ती गुल
त्यास चारदाण्याचं पानफूल
केलंय दाखवताय फुल...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव ©®

Comments
Post a Comment