मुंगी ✍️
|| मुंगी ||
सर्वात जरी आहे लहान
विचार मात्र करते महान
नियमित असते वाटचाल
ठेवते कुटुंबाची जाण…
पृथ्वीवर जमिन जेथे
आढळतात मुंग्या तेथे
संख्या असंख्य आहे
मृत जीवही खाते…
ध्यास श्रमाचा सार्यांना
विघटन करत भक्ष्य
पट्पट चाल दूरदृष्टी
गोळा करणे लक्ष्य…
प्रथम संशोधक संघटक
बुरशीशेती भुसभुशीत बीजपेरण
प्रजाती निर्मिती बुरशींची
शेती अन्न साठवण…
सतत मग्न शोधण्यात
स्ववजनाहून अन्न भारी
जमून आवश्यक तितक्या
एकत्रित नेई घरी…
क्षणात लाखो जमा
तुटून पडता रक्षणात
गायब होतात बिळात
जीव घेई हत्तीचा कानात…
चाहूल पावसाची घेत
सुरक्षित स्थळी जातात
तिचे स्थलांतर जाणत
शेतकरी अंदाज घेतात…
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
©®

व्वा छानच रचना
ReplyDeletehttps://meelekhika.com यावर माझ्या कथा कविता जरूर वाचा.
ReplyDelete