भाकर
|| भाकर ||
जगण्यासाठी लागते भाकर
दुनिया जगते त्यावर
उपासमार येते पीकवण्यार्यावर
उचलतो साऱ्यांचा भार.
दुनिया जगते त्यावर
उपासमार येते पीकवण्यार्यावर
उचलतो साऱ्यांचा भार.
कपडे नसतात अंगभर
कर्ज असतं डोक्यावर
ताण पडतो मनावर
तोच लटकतो फासावर.
कर्ज असतं डोक्यावर
ताण पडतो मनावर
तोच लटकतो फासावर.
कळवळा दिसतो गावभर
मानली त्यानं हार
तऱ्हा निराळी जगभर
कशी मिळेल भाकर.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव ©️®️
Comments
Post a Comment