दुरावा
|| दुरावा ||
काय झालं तुला
समजतं नाही मला
कंटाळा आला तुला
वाटतंय सोडतेय मला…
सध्या बोलणं कमी
कमी होतेय का हमी
लांब आहे तुमि
कशी देऊ हमी…
वाटलं काम वाढलं
कधी वाटतं सोडलं
मन माझंही पडलं
काहीतरी असंच घडलं…
वाढतोय दुरावा फार
पाहतोय नुसताच शिंगार
वेदना मनात फार
ह्दयात होतात गं वार…
नको करुस असं
माझं जीवनाचं हसं
जगतोय मीही कसबसं
समजावू तुला कसं…
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
©®
Comments
Post a Comment