बेडूक
सर्वदूर जलात दिसतो
पावसात जमिनीवर दिसतो
मानवा सम अवयव
नाजुक मऊ भासतो…
जीवशास्त्र अभ्यास करतांना
मानवा सम रचना
शिक्षक यांची मद्त
प्रयोग दाखवुन संरचना…
चिरफ़ाड यांची होते
शिकण्यास माणसास मिळते
आवाज घुमतो यांचा
हमीने पाणी पडते…
सुचक जीव पावसाचा
मऊ शरीर बेडकाचे
पेशी अंनत यात
आरोग्य दर्शक सर्वांचे…
यांचा जीव जातो
शिकून डॉकटर होतो
बुद्धी आपण चालवतो
आरोग्यमय माणूस जगतो…
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
©®

Comments
Post a Comment