गोड पुरण पोळी ✍️

|| गोड पुरण पोळी ||


पुरणाची पोळी 
खायची गोडी 
खाणारी  भोळी 
एकोप्यात सगळी.

प्रथा  आगळी वेगळी 
गोड  खाऊन सगळी 
नाते जपत घट्ट 
लहान थोर मंडळी.

चुल पेटे घरात 
आई जवळ परात 
बाप जरी रानात  
सुगंध पसरे परसात.

पुरण भरून खापरावर 
टाके त्यावर पोळी 
चटके खाऊन करी 
खायची मजाच सगळी.

चंगळ मुलांची लयभारी 
पाहत होई पोळी 
त्यात असायची गोडी 
दुर्मिळ ती पुरण पोळी.

आठवण जपली थोडी 
आनंदी लहानथोर सगळी 
 पूर्वीची तऱ्हा  वेगळी 
नातं आता बेगळी.


प्रदीप मनोहर पाटील 
मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव 
©®

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे