माझी लेखणी ✍️
|| माझी लेखणी ||
विचार येता मनात
मांडतो तेच लिहण्या
बुद्धी जरी अल्प
विचार लोकात रुजवण्या…
मांडतो तेच लिहण्या
बुद्धी जरी अल्प
विचार लोकात रुजवण्या…
तोडकं मोडकं लिहतो
मन माझं दिसतं
कामातुन वेळ असतो
लिखाण तेव्हा असतं…
घरच्या भाकरी उकिरड्यावर
असंचं सारं वाटतं
मिळतं नाही काही
मनाला खरं पटतं…
गाडगेबाबांचा चालु वारसा
तुकारामांचा दावतो आरसा
संदेश राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा
कुप्रथा अंधश्रद्धा मोडण्या वसा…
आवाज सामान्य गरिबांचा
संस्कृती सृष्टी प्राणिमात्रात
जीवन करतोय सत्पात्र
सत्यता मज विचारात …
छंद लागला लिहण्याचा
भ्रष्ट्राचारींना लागते प्रहारास
मिळाला यातुन मानसन्मान
दुराचारीना लेखणी ठेवतो झोडपण्यास…
प्रदीप मनोहर पाटील
मु. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©®

Nice
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteअप्रतिम सर
ReplyDelete