स्वप्नं माझं
|| स्वप्नं माझं ||
स्वप्न जगत कल्याणकारी
प्राणिमात्र जीव सुखकारी
जीव जात हितकारी
सृष्टी संगोपन करी.
वैश्विक आनंद निर्माणकारी
निरोगी दिसो सारी
सुख शांती दारोदारी
नसे कुठं भुकमरी.
आदर्श पुरुष अवतारी
माताबघिनी माने सारी
भाऊ समजे ती
रामराज्य गुण धरी.
जातीधर्म गाडून मानवता
कास विकास करी
अखंड एकता जोपासी
प्राणी मानवजात सारी.
विकृत भ्रष्ट मरी
सुखी निरोगी कामकरी
नसे कोणी कर्जबाजारी
समृद्धी नांदी घरोघरी.
रयत राज करी
नसे वृद्धाश्रम झोपडपट्टी
आत्महत्या कोणी न करी
एकमेकांची किंमत ऊरी.
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
©®

Comments
Post a Comment