पूर्वीचे आताचे रंग प्रेमाचे

|| पूर्वीचे आताचे रंग प्रेमाचे ||

रंग होते निर्मळ 
संग असायचा प्रेमळ 
भावना मनात नात्याच्या 
कटाक्ष असायचा सरळ.

दुरून वेक्त होत 
बसत नुसतं पहात 
 भानात  उधळत रंग 
सारं भरत मनात.

कितीही कल्लोड भावनांचा 
आदर्श पुर्वी प्रेमाचा 
संस्कार असतं मनात 
जरी जीव एकमेकांचा.

रंग प्रेमाचे उल्हासित 
नयन भावना शुद्ध 
मन बुद्धी निर्मळ 
सर्व साक्षिने  वचनबद्ध.

विरले  रंग प्रेमाचे 
असतात आता जोमात 
मन बुद्धी वासनात 
राक्षस उरले मानवात.

काळ कलियुगी आला 
प्रेमाचा रंग उडाला 
मानव आततायी वासनांध 
कसा आता जन्मला.

वाटतं उडाले रंग 
होत स्वप्नं भंग 
मग बांधुन चंग
 संम्पवून  तोडता संम्बध.


प्रदीप मनोहर पाटील 
मु. पोस्ट गणपूर 
ता. चोपडा जिल्हा. जळगाव 
©®

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे