चारोळ्या : अवकाळी पाऊस
| | चारोळ्या | |
| | अवकाळी पाऊस | |
1)
लागलाय बळी कामाला
पिकांना जोम आला
उधाण आलं मनाला
त्यात का रं तु अवतरला…
2)
उन्हाळा सुरु झाला
त्यात अवकाळी आला
हवेत गारवा निर्मिला
मनाला चटके देऊन गेला…
3)
चाललं होतं सुरळीत
यंदा मिळेल सुख
मनात होतं शेतकर्त्यांच्या
अवकाळीने दाखवले दुःख…
4)
काय सांगु राजा
वाटलं होईल मजा
कोणत्या कर्मची सजा
दाखवला पुन्हा दरिद्री दरवाजा…
5)
वाटलं यंदा घास
मिळेल सुखाचा आस
अवकाळी पाचवीला ताटास
बसेल सावकारी फास…
6)
जीव होतो वेडापिसा
संसार हा असा
उतरेना कर्ज डोंगर
अवकाळी मुळे जसाच्या तसा…
7)
नको कुणाचे उपकार
कुठं फेडू भार
यंदा आशा होती
पळवली अवकाळीने पार…
8)
सरकारी धोरण शेतकऱ्याच मरण
होतं अवकाळी नित्याचं आगमन
कसं मुलांचं लग्नाचं तोरण
दुरावस्था पाहुन रोजचं मरण…
9)
भीक नको हक्काचं हवं
मालाला दाम हवा पुर्ण
जे पिकलं सोनं आमचं
खाऊ सुखाचं घरनं…
10)
दुनियाच ज्याची खाते पोळी
त्याच्या जीवनाची नको होळी
अवकाळी नको बरसू अवेळी
सुखाची भाकरी मिळूदे थोडी…
11)
उच्चं शेती मध्यम व्यापार
कनिष्ठ होती नोकरी
वासे उलट फिरली
मरणाची वाट शेतकरी धरी …
12 )
कितीही उलट फेर येवो
बांधवांच्या मनगटात धीर येवो
कित्तेक अवकाळी पचवले
उत्पन्न मालाला किंमत येवो…
13)
पुर्वी राज्याला जाण
शेतकऱ्यांना मिळे मान
कुणाला नाही आता जाण
अवेळी पावसानं पडतोय ताण…
14)
पावसा वेळीच गोडी
आहोत आम्ही भोळी
हिरावते तोंडातुन शिदोरी
बाप होतात वेडी…
15)
दिवस होते तुझे
तेव्हा खुप बरस
नाही आता गरज
नको अवेळी त्रास…
16)
आता नाही फास
पाडु धान्याची रास
हाच घेऊ ध्यास
मुलं पाठवु शिकण्यास…
प्रदिप मनोहर पाटिल
मु. पोस्ट गणपूर ता चोपडा
जिल्हा जळगाव ©®

खूप छान
ReplyDeleteअप्रतीम कविता सर
ReplyDeleteफारच छान सुप्पर👌💐
ReplyDeleteपाऊस व शेतक-यांच वास्तव सुऱेख मांडलय
ReplyDelete