बल सागर भारत होवो.✍️
| | बल सागर भारत होवो | |
ह्या ओळी आठवल्या तर एक प्रकारची फुर्ती स्फुरण येत असे आणि येतंय. पूजनीय श्री साने गुरुजी आत्मत्मीयतेने लिहले. त्यात जी आत्मीयता देशप्रेम देशाप्रती जी भावना वर्तवली भारताच्या उज्ज्वल भविष्याची त्यांच्या मनातील संकल्पना मांडली तीच ह्या देशातील सर्व तमाम जनतेला हवी अभिप्रेत आहे. स्वतंत्र मिळवण्यासाठी ज्यांनी आपली प्राणाहुती दिली ते क्रांतिकारी वीर सर्व महापुरुष स्वतंत्र पूर्वी होऊन गेलेले जन्मलेले साऱ्या जनतेच्या मनातील संकल्पना होती देश स्वतंत्र करून आपलं आपल्या जनतेचं राज्य निर्माण होऊन एक स्वतंत्र भारत निर्माण व्हावा आणि तो झालाही. स्वतंत्र निर्माण झाला पण स्वतंत्र संकल्पना तद नंन्तर फारशी रुजली नाही नेते राजकारणी नोकरशाहीत.सामान्य जनते विषयी आस्था नाही पण पोपट पंची करून कुठंही कशीही सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करू लागलीय गल्ली ते दिल्ली हेच चित्र. साम, दाम, दंड, जातीयभेद सारं तंत्र जनतेवर वापरून ग्रामपंचायत असो वा विविध संस्था ते विधानसभा, लोकसभा, विधानभवन पर्यंत सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी झुजतांना पाहते जनता. देशानं प्रगती केली पण वैचारिक पातळी वर अधोगती सारखंच झालं भ्रष्टाचार अराजकता जनतेला ओरबाडणे जनतेची कामं न करणे वर्षो न वर्ष प्रलंबित मागण्या प्रश्न न सोडवणं आलेला कागद वजन ठेवल्या शिवाय पुढे सरकत नाही. नाही वजन असलं तर तो कागद तेथेच जीर्ण होऊन फाटतो पण त्या कागदाला किंमत दिली जातं नाही. भ्रष्ट सरकारी यंत्रणा यांचे प्रताप दिवसा गणिक वाढताय पण कमी होण्याचं नाव घेतं नाहीत. पन्नास पन्नास वर्ष दाद मिळतं नाही प्रश्न सुटत नसतील तर काय उपयोग. पिढी जाते दुसरी येते पण प्रश्न तसेच शिल्लक. हाच का बलशाली भारत या स्वतंत्र पूर्वीचे क्रांतिकारक विचारवंन्त महापुरुषांना अभिप्रेत होता? कुठं फेडाल पाप वरती गेलेले महापुरुष क्रांतिकारी तळमळत विव्हळत असतील. याच साठी दिले का बलिदान का रक्त सांडलं आपलं हा प्रश्न स्व मनाला विचारत असतील कदाचित असंच वाटतं. असेल त्यांना भारतात अंनत क्रांतिकारी असे झालेत जे इतिहासाच्या पानात सापडत दिसतं नाहीत. देशा साठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं ते पण येथे भाकरी साठी वणवण फिरतांना भटकले असतील येथे. त्यांची साधी दखल घेतली गेली नाही अदृश्य राहिलेत येथे असं वाटतं. इतिहासातील सत्पुरुष आजच्या भारताला पाहून अश्रू गाळत असतील. येथे तर मला वाटतं एक पण महापुरुष असा पाहिला गेला नाही अगोदर त्याची जात पाहिली जाते सर्व जातीधर्मात त्यांना जोखडून ठेवलं जातंय. हि मोठी शोकांतिका आहे. एकसंग भारतात एकसंग लोकं नाहीत सारी सारी संकुचित मानसिकतेत अडकली देशाप्रती प्रेम सर्वांना आहे पण देशातील लोकं एकमेकांना चालत नाहीत. आजचं सारं जे चाललंय ते अगोदरच समजलं असेल स्वतंत्र भारतातील जनता कोणत्या मार्गानं चाललीय हेच पाहून उत्कृष्ट रचनाकार सोज्वळ भावनिक देशप्रेमी क्रांतिकारी गुरुजीनीं अगोदरच समाधी घेतली असावी. त्यांच्या जयंती दिवशी लिहावे वाटले चुकलं असेल तर त्या अन त्यांच्या सारख्या महान आत्म्यांची मी माफी मागतो. पण आता दृष्ट, भ्रष्ट, जी वागत असतील त्यांना क्रांतिकारकांचे स्वप्नं भंग करणार्यांना क्रांतिकारक कदापि ते माफी देणार नाहीत.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव ©®


छान
ReplyDeleteखूप सुंदर पाटील सर
Deleteखूप छान माहिती आहे।।।
ReplyDeleteअंतर्मुख करणारा लेख.
ReplyDeleteVery good sir
Delete