आयुष्य वर्ष ✍️


| | नवं वर्ष (आयुष्य ) | |


येणार सुख नवे 

कुटुंब सुखात राहे 

अपेक्षा हीच आहे 

स्वप्न पूर्तीत उतरणारे हवे... 


सुकीर्ती त्रिखंडी वाहे 

 स्वप्न डोळ्यात  राहे 

निरोगी मन शरीर 

शांती आयुष्यात येऊन राहे..


गाव सीमा प्रांत 

देश विदेश शांत 

जातपात नष्ट  विश्वची 

अवघे सारी सुपंत...


असं  नवं वर्ष हवे

हीच मनोकामना हृदयात वाहे 

स्वप्न अशी आनंदी 

प्रदीप नवं वर्षात पाहे... 


वर्ष जुने सुखदुःखात 

दुःख विसरून सारे 

सुख सामावून हृदयात 

आठवणीत ठेवू सारे... 


गेले होते ते 

छान वाटते का रे 

जुन्यात सार का रे 

नव्या चा भार रे...


जुने नवे सारे 

मनाचे खेळ का रे 

शून्य ते शेवट 

त्यात कुठं नवं जुने रे...


सारे मिळून एकत्र 

मोजमाप होते रे 

कस जगलो असं 

याचीच आठवण राहते बरे....


विश्वात जेवढ जगतो 

तेच आपलं वर्ष  नवे

सोडून जाऊ जेव्हा 

होऊ आपन जुने...


वाटतं असं आता 

रोजच जगतो ते नवं 

गेल्या नंतर येतील 

त्यास मी म्हणेन जुनं...


होऊ जेव्हा जुने 

शिल्पात पुस्तकात राहु 

जगात नामाकित होऊ 

वाटचाल अशीच ठेवू....


चिरकाल जगताय महापुरुष 

त्यांच्या साठी हे जुनं 

आयुष्याच करू सोन 

अजरामर होऊ दे हेच मागणं....



प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा.जळगाव ©®


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे