बैलपोळा
| | बैलपोळा | |
व्रत पशु सेवेचं
आलोय तूझ्या सेवेला !!धृ !!
आजोबा पणजोबा पूर्वजांनी
बांधलंय तुला दावणीला
तीच परम्परा सुरु
तूच आहेस संगतीला…
राब राब राबतोस
कष्ट आपल्या पाचवीला
जुंपतो शेतात औताला
बांधावरचं गवत तुला…
ऊन पावसात कामाला
दुशेर तूझ्या मानेला
जुंपतो पेरणी तिफनाला
माफ कर शेतकऱ्याला…
मूक सुख दुःख सोबतीला
धुवून रंगवून सजवला
खाऊ घालतोय पुरणपोळी
पुजतो या सणाला…
जिणं सृष्टी संग
राबुन मातीत थकला
लावतो ट्रॅक्टर हार्वेस्टर
देतोय विश्रांती तुला…
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव ©®
Khup chan
ReplyDeleteफारच सुंदर
ReplyDeleteएकच नंबर. साहेब
ReplyDelete