लेखणी ✍️

| | लेखणी | |


1)
लेखणी असतेस निर्जीव 
शब्द भासतात सजीव 
ज्ञानी होतो जीव 
कार्य होतं भरीव…


2)
 लेखणीची किमया भारी 
ज्ञानदीप लावते दारी 
कादंबरी गाथा अवतारी 
मार्गदर्शक सत्य वाटेकरी… 


3)
अक्षर उमटते सोनेरी 
भाव दाखवते कागदावरी 
वाचून करतेस संस्कारी 
मानव जीवन तारी…


4)
 साकारते  शब्द मोती 
कुठं जुळवते प्रीती 
रुजवते  मानवात संस्कृती 
जोडते त्यातून नाती… 


5)
कथा कविता कादंबरी 
गाथा निर्मितीकार लेखणी 
शब्द उमटवते देखणी
साहित्यातील आहेस साम्राग्रीनी… 


6)
क्रांती जोत लेखणी 
तोडते पाश अन्यायाचे 
झुगारून सारे बंधने 
उभारते साम्राज्य  न्यायाचे… 


7)
ढाल तलवार तोफ 
कधी बंदूक लेखणी 
मारून दृष्ट विचार 
होतेस सद्विचार स्वामींनी… 



प्रदीप पाटील.
मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव 
©®


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे