पोळा
| | पोळा | |
सण आला पोळा
देव होतात गोळा
चला सजवू बैलाला
मूक प्राणी भोळा…
विश्रांती देऊ त्याला
सदैव राबतो शेताला
साथ त्याची शेतकऱ्याला
मान देतोय पोळ्याला…
देतोय साथ सोबत
मिळतो आराम मला
राबणं तुझंच संगतीला
कळा तूझ्या मानेला…
उन्ह पाऊसात राबतो
औत ताकतीनं ओढतो
माती सोबत जुळतो
तरी चौखूर पळतो…
खरा मित्र शेतकऱ्याचा
भार हलका मालकाचा
ऋणी तोही बैलाचा
मान सण पूजेचा...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव©®
व्वा व्वा मस्तच मस्त😍💓
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteव्वा!
ReplyDeleteफारच छान!👌👌👌
छान आहे खरच
ReplyDelete