किती पुजावा देव

| | किती पुजावा देव | |


अंतरंगी असतो देव 
तेथेच ठेवु भाव 
दगडात नसतोच राव 
म्हणतात मला पाव. 

पूजावा जाणावा मानावा 
 जीव जीवात पहावा 
दीन दुःखितात शोधावा 
निर्मळतेत त्याला अंगिकारावा. 

सेवा आईवडिलांची करावी 
पाय त्यांचीच धरावी 
बुवाबाजी अंधश्रद्धा गाडावी 
कश्याला बोकड मारावी. 

चल अचल सृष्टीत 
देव पडेल दृष्टीत 
एकरूप होऊ त्यात 
जीव ठेवू  जीवात. 


प्रदीप पाटील 
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©®

Comments

  1. कविता वाचून मला खूप आनंद झाला. लोक आंध्रश्रद्धा फार गुरफटलेले आहेत त्यांना दिशा देण्याचं तुम्ही छान काम केलात धन्यवाद सर.
    सावित्री शेवाळकर

    ReplyDelete
  2. खरा परमेश्वर हा असाच सापडतो..छान

    ReplyDelete
  3. Ekdam correct lihale ahe.
    Khup chaan

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे