राजे संभाजी
| | राजे संभाजी | |
बलदंड बाहू राज्यांचा
छावा शोभला शिवरांयाचा
कर्दनकाळ दुष्ट भ्रष्टांचा
अजिंक्य लढवय्या सह्याद्रीचा…
पुरस्कर्ता सर्वधर्म जोपासण्या
रक्षिता हिंदू धर्माचा
पालन पोषणकर्ता दीनदुखीचा
संघर्ष आला जीवनभरचा…
बळी पडला फितुरीचा
काळ होता औरंग्याचा
पण कैदेत त्याच्या
धडा दिला मरणाचा…
यातनेत अंत वीरपुरुषाचा
नातु जिजाऊ चा
सन्मान करे आईबहिणीचा
धनी येसूबाई चा…
प्रदीप पाटील
गणपूर (जळगाव )
©®

मानाचा मुजरा....जबरदस्त लिहिलय
ReplyDeletecol. 7wt 6t
ReplyDelete