नवं वर्ष ✍️
| | नवं वर्ष | |
स्वागत करू नववर्षाचे
दिवस येतील हर्षाचे
क्षण येतील आनंदाचे
आयुष्य आहे जगण्याचे….
दिवस येतील हर्षाचे
क्षण येतील आनंदाचे
आयुष्य आहे जगण्याचे….
मन भरून राहण्याचे
स्वप्न सुखी संसाराचे
निरोगी शरीर राहण्याचे
फळे चाखु कष्टाचे….
ऋण फेडु आईवडिलांचे
पाईक आपण देशाचे
लेकरू आहोत स्वधर्माचे
भाऊ आहोत परधर्माचे….
कुटुंब भारत एकोप्याचे
विसरू राजकारण जातीपातीचे
सोडू द्वेष परजातीचे
होईल नाव देशाचे…
कल्याण सारं जनतेचे
अंगीकार करु तंत्रन्यानाचे
मोडू कम्बर्डे भ्रष्ट्राचार्यांचे
दिवे लावु न्यानाचे ..
आशीर्वाद आपल्या महापुरर्षांचे
नका करु त्यांना जातीपातीचे
होते ते देशाचे
नहोते कुण्या धर्माचे….
कुटुंब आपुले मायेचे
हात आधार देण्याचे
मजेत स्वागत नववर्षाचे
आचंद्रसूर्य अखंड भारताचे...
विश्वात धुरा महासत्तेची
करु प्रगती देशाची
पूजा मांडु जीवांची
शक्ती आपल्या कुटूंबाची….
नवं त्याच गुणगान
जुने आपली शान
उंचाउ साऱ्यांच राहणीमान
अंगीकार धरू स्वाभिमान….
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर
ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©®

वा सर छान
ReplyDeleteBhai very meaningful
ReplyDelete