मकर संक्रात (क्र 2)✍️
| | संक्रात | |
सण गोड आला
महत्व देऊ त्याला
तिळात गुळ घाला
पौष्टिक तत्व याला.
सुरवात दुसऱ्या आयनाला
सौर मंडळ चक्राला
उलथापालथ घडते पृथ्वीला
महत्व माणसाच्या एकोप्याला.
देवु हात आधार
तोच वरती सूत्रधार
उचलु थोडा भार
गोड देण्यात सार.
वाटु चांगलं सारे
वाहवेत प्रेम वारे
ओळखु माणूस माणसं रे
करु गोड सण रे.
नको कुणावर संक्रात
राहु आनंदी शांत
गोडीत असु निवांत
जीव सर्व प्रेमात.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©®
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©®

छान खूपच छान मकरसंक्रातिच्या हरदिक शूभेच्छा दादा
ReplyDelete