सावलीचं घरटं

| | सावलीचं घरटं | |


मुळ ग्रामीण भागातून गावात राहणारा तरुण त्याच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शहरात येतो स्वप्नं तर काय निराश्रित निराधार गरीब मुलांना जवळ करून त्यांना एक स्वताच घर वाटावं अशी संस्था सावली निर्मीतीली सावली याचाच अर्थ एखाद्या मोठया  माणसाची उन्हात उमटलेली ती एक सावली अगदी तसंच कार्य आपल्या स्वतःच्या सावलीतून कुणाला लहान जीवांना कधी उन्हा पासून त्रास कमी होतो उष्ण उन्हाच्या बसणाऱ्या झळा त्या मोठया उभ्या असलेल्या पेक्षा लहान यास त्या वेळी उन्हाचा थोडा कमी होणारा त्रास कमी करून जातो. अगदी नकळत कुणा लहान जीवास थोडी जीवाला शांती देऊन जातो ती असते एक एक मोठया जिवा पासून मिळणारी सावली. बरं सावली ही पृथ्वीवरील प्रत्येक उंच जीवसृष्टी, वस्तू, चल अचल भ्रम्हांडातील सारे यांची पडछाया म्हणजे सावली हा झाला सावली चा अर्थ माझ्या मताने. जसं सावली सुखावून जाते कळतनकळत अगदी तसंच  आपली सावली दुसऱ्या जीवास जसं काही क्षण सुखावून जाते तसंच आपण केलेलं कार्य दुसऱ्याला नकळत कधी सुखावून जातं कधी याच पद्धतीने आपलं जगणं अन वागणं असावं आपण जेथे असु तेथे आपल्याला मिळालेल्या उंची मुळे सदोदित कुठं कळत नकळत का असेना आपण खारीचा वाटा सावली सारखा उचलतं असतो अन उचलतं राहावा असंच जगणं हवं जीवाचं.याला म्हणतात सावली असो. 

  मला असंच हे  सांगायचं तात्पर्य आपल्या जवळ असलेली साधन साम्रगी आपल्या अन आपल्या कुटूंबातील साऱ्यांच्या गरजा आनंदात पुरून कधी उरलेलं अडगळीत पडलेलं कधी स्व कमाईतून मिळालेले कमावलेल्या पैश्यातून मिळालेली संपत्ती त्यातुन थोडं उरून ठेवावं नोकरी उधोग छोटयामोठ्या आपल्या व्यवसायातून  शेतीतून शिल्लक रकमेतून म्हणजे फक्त पाच टक्के पूर्वी काढत होते  नव्हे आता दोन टक्के तरी करावं असं आपली संस्कृती सांगते  माझ्या माहितीप्रमाणे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्याकडे पूर्वापार पारंपरिक प्रथा होती अजूनही आहे. शेतात पिकवलेल्या धान्यातून अगोदरच काही कणसं काढून ठेवतं त्या कणसाची पहिली भाकरी गाईला अन गोऱ्याला खाऊ घालत त्या नंतरच  त्या धान्याचा   स्वतः आस्वाद घेत असतं आपल्याला मदत करणाऱ्या जिवा प्रति आस्ता त्यांच्याप्रती असलेला जिव्हाळा.अगदी  तसंच खळ्यात आलेल्या धान्याची रास पुजन करून मग घरी धान्य नेत शेवटची बैलगाडी खळ्यात राहुदेत त्यातून मग  नंन्तर गावातील कामकरी   गरीब गरजवंन्त  यांना वाटप करतं दान म्हणून.  गरीब अनाथ उपेक्षित आपल्या आजूबाजूला असलेल्या गावातील लोकांना वाटतं असतं ही पारंपरिक परंपरा   प्रचलित रूढी आजही घरी किंवा कुठं काही सामाजिक कार्य असेल कुणी घरी दान मागण्यास आला तर त्यास कधीच रिकाम्या हाताने परत पाठवु नये काहीतरी त्याच्या झोळीत दान दयावं आपल्या जवळ असलेल्या साधन संपत्ती कुवती प्रमाणे. अशी  शिकवण होती मला घरी तशीच  इतरांना  असेलही ग्रामीण भागातील. जिवा साठी केलेली मदत उपयुक्त असते आपल्याला मिळालेलं जीवन त्यात सहभागी सोबत  जीव त्यांना आपण मदत केली तर ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भरभरून परत मिळतं असते.  हे निर्विवाद सत्य आहे. हे झालं दान करण्याची वृत्ती लोकां प्रति आपलं असलेलं कर्तव्य म्हणून आपणास या लेख माध्यमातून सांगतोय आपण पण जीवनात सदोदित कुठं ना कुठं खारी चा वाटा उचलतं राहावा अन जीवसृष्टी आनंदी करतं राहावी. अगदी तसंच तसं सावली याचा अर्थ अभिप्रेत वेगळा आहे  सावली आधार गरीब अनाथ मुलांना जीवन जगण्यासाठी अगोदर अन्न, वस्र,  निवारा मला अभिप्रेत स्वतःच घरटं असं हकाचं निर्माण करून दिलंय सावली या संस्थेनं त्या इवल्या रोपट्याला बनसोडे यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या अतुलनीय कार्याला किंवा तत्सम विविध संस्था यांना मोठी श्रीमंत यांनी आपल्या उंची एवढ्या सावली सारखं व्हावं कळतनकळत खारीचा वाटा उचलतं जावं अन त्यातून चिमुकल्याचे स्वप्नं साकारत जावं अश्या घरट्यांना सतत मदत करून निर्माण होणाऱ्या त्या घरट्याच्या सावलीतून कधी कळत नकळत कुणी अजून येणारे दुसरे जीव सुखावून जातील. म्हणून सावलीच्या घरट्यास बळ द्यावं त्या सारख्या संस्थांना मोठया कराव्यात अंध,  अपंग निराधार, गरीब, उपेक्षित, वृद्ध आश्रम, पाणी,  वृक्ष संवर्धन, पशुप्रेमी  अश्या अनंत संस्था ज्यांना आपण मदत करू शकतो. सावलीच  मोठं घरटं व्हावं म्हणून खारीचा वाटा लिहून उचलण्याचा छोटासा लिहण्याचा छोटासा प्रयत्न केलाय जरूर अनेकांनी पुढे यावं दानधर्म करावा करतं राहावा. राजे छत्रपती यांच स्वप्नं  रयतेचं राज्य निर्माण व्हावं श्रीची इच्छा निर्मिण्यास मदत व्हावी तसंच गांधीजी , , बाबा आमटे,  भावे, साने, शाहू,  फुले, आंबेडकर, ज्ञानोबा,  तुकाराम महाराज  संत, महंत, माझे आजोबा आण्णा अन तसंच आपले गुरु शिक्षक वडीलधारे याची शिकवण   यांच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कार्यरत  होऊ  सारे जीव सुखात समृद्धीत राहावेत म्हणून आपणही कार्यरत व्हावं बळ दया दिलेलं वाया जातं नाही दुपट्टीने परत आपल्याला किंवा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला निश्चित परतावा देऊन जातं असते. 


(सावली संस्थे साठी लिहलेला लेख या सारख्या सामाजिक शैक्षणिक संस्था जन हिताचं दीन दुःखी, अंध, अपंग, वृद्ध, वृद्धाश्रमात, विधवा, निराधार, निराश्रित  अन अनंत गरीब लोकांना मदत होईल असं कार्य करणाऱ्या संस्था  यांना मदत करतं राहावं जनतेनं आपल्या मिळकटीतुन अल्प का असेना  त्या साठी छोटासा लिहण्याचा प्रपंच  )


प्रदीप मनोहर पाटील 

मु. पोस्ट गणपूर ता चोपडा 

जिल्हा. जळगाव ©®

Comments

  1. खुप खुप छान
    अप्रतीम

    खेड्यातले ते भाबडे।शहरात गेले पैशे कमवले पण माणुसकीला मुकले

    धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे