वडिलधाऱ्यांचा आदर ✍️
| | वडिलधाऱ्यांचा आदर | |
ज्यांच्या वंशजांत जन्मलो
पृथ्वी तलावर अवतरलो
छाया छत्रात वाढलो
त्यातून माणूस घडलो.
संस्कार संस्कृती सद्विचार
आचार विचार शिकलो
जीव माणूस म्हणून
माणसा माणसास भेटलो.
आदर्श घेऊ वडिलधाऱ्यांचा
आदर करु त्यांचा
वाहवू नका कुठं
जीव सुखात ठेवा यांचा.
मिळेल किंमत तुम्हाला
सार्थकी या जन्माला
आशीर्वाद मिळतील वंशजाला
पारावर नसेल सुखाला..
जनात मिळेल मान
विठ्ठल धावेल छान
बनु पुंडलिक समान
जरी असलो लहान.
देव यांच्यात पाहु
आनंदानं गाणं गाऊ
मजेत शांतीत राहु
सुख समृद्धी मिळवु.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©®

खूप सुंदर लेख 👌🏻👌🏻
ReplyDelete