रंगात रंगू या

| | रंगा रंगू या | | 

(रंग जीवनाचे )

रंगात रंगू जीवनाच्या 
आयुष्याचा  खेळ रंगीत 
आवडतं त्यात संगीत 
तारुण्यात जुळते प्रीत.... 


बालपण जात सवंगळीत 
लहानथोरांचे ज्ञान घेण्यात
संस्कार अंगीकार जोपासण्यात 
बुद्धी उंची वाढते त्यात.... 


तारुण्य घालवतो कर्तृत्वात 
लोकांचे बहुरंग समजण्यात 
कुठं घात विश्वासात 
जुळतं  नातं त्यात ... 


तारुण्याचं फळ वार्धक्यात 
आरामात सुंदर जगण्यात 
वेळ जातो कापण्यात 
पेरलं ते सोसण्यात..... 


वाट सारी चढउतारात 
प्रेमात रडत पळत 
वाजत गाजत नाचत 
कुढंत मरत जगत.... 

 खेळ रंगी  जीवनाचा 
ऊन सावल्याचा वाऱ्याचा 
उडण्याचा दम गुटण्याचा 
एकांताचा गर्दीत वाहण्याचा.... 


आयकण्याचा कर्तृत्वाचा पराक्रमाचा 
नात्याचा  जोडण्याचा भावनांचा 
मायेचा ममतेचा सागराचा 
जीवन झरा रंगीत  पाण्याचा.... 




प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव 
©®

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे