गुढी मांगल्याची
| | गुढी मांगल्याची | |
वृक्षास नवं पालवी
चैतन्य सारं खुलवी
सुगधं पसरे मोहराचा
सृष्टीस बहर नवी...
सोडुन कात जुनी
गर्द हिरवाई फुलवी
दाट फुटली पालवी
ओल उन्हात टिकवी...
सोडून जुनी पालवी
तीच सारी कुजवी
अन्न त्यातुन घेत
रुक्ष आपला वाढवी...
अस्तित्व स्वतःचं टिकवी
मानवास सारं शिकवी
पोट आपलं भरी
शिकवण अंगीकार करावी...
तेजाळलं सारं आसमंत
उष्ण वाऱ्यावर स्वार
सावलीत मन गार
स्वागताची मानवा गुढी उभार...
संकल्प सारे करू
सृष्टी सन्मान धरू
छेडछाड प्राण्यासंग नको
नवचैतन्य गुढी उभारू...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®
मंगलमय गुढी👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमांगल्य जपणारे काव्य. सुंदर !
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
Delete