काव्य ✍️
| | काव्य | |
राज्या ची तु राणी ग
दिसते कशी शोभुनी गं....
गडावरी आली नववारी नेसुनी
उभी दरवाजा धरुनी
साद घातली त्यावरूनि
ध्वनी घुमला कड्याकपारीतुनी...
आस लागली धन्याची
येईल सजना चढुनी
पाहंते काळ्या चष्म्यातुनी
वाट पाहे दुरुनी....
केस मोकळे सोडुनी
सूर्य आला प्रकाशुनी
चकाकली त्वचा त्यातुनी
लावंण्या दिसल खुलूनी.....
दुरुनी ठसली मनी
पाहुनी मन भुललं
सांगितलं मनाला समजावुनी
आहरे राज्याची ती राणी.....
वाग अंतर ठेवुनी
टोपी जाईल पडुनी
जाईल ती निघुनी
टाक मनातून काढुनी.....
जखम वाहील भडभडुनी
व्रण राहतील पडुनी
नको पाहुं वळूनी
पाणी येईल डोळ्यातूनी.....
वाट तुझी रानातूनी
घेते विसावा महालातुनी
पुन्हा चटका बसुनी
अंतरंग जाईल भाजुनी....
ती जाईल विसरुनी
कशी निघेल मनातुनी
हळवं नको होऊस
फिटेल तुझी हाऊस....
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®

Comments
Post a Comment