कोरोना एक आपत्ती
| | कोरोना एक आपत्ती | |
जन्म विषाणूंचा घाणीत
प्रसार होतो द्विगुणित
कोरोना निर्माण चीनभूमीत
संसर्गाने पसरला अगणित....
आपत्ती निर्माण झाली
माणसं मृत्युमुखी पडूलागली
आजाराची भयानकता वाढली
मानवजात संकटात आली...
पृथ्वी केली प्रादाक्रान्त
तर येईल संक्रांत
सोडा सार्यांनी भ्रांत
दिसेल साऱ्यांना आसमंत....
जपु स्वच्छता मंत्र
अंतर हेच तंत्र
मास्क वापरु स्वतंत्र
घरात राहु निवांत....
काळजी आदेश पालन
देशाचं स्वाभिमान चलन
करू याच निर्मूलन
आपत्ती आली चालून...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®


वास्तववादी चित्रण.
ReplyDelete