होळी
| | होळी | |
( संस्कार आणि संस्कृती पर्व )
करू साजरी होळी
जेवणास गोड पुरणपोळी
खाण्याची सर्वांना गोडी
माणसं असतात भोळी...
अंधार थंडी सोडू
प्रकाश पर्व उजाळू
नवपर्व सारं अवतरू
पालापाचोळा सारा जाळू
जुने ते सारे सोडू
वृक्षवल्लीचे सांगणं अंगिकारू
उन्हात गारवा धरू
संकटात जोमाने सावरू....
स्वागत वसंताचे करू
दांडा मातीत गाडू
नारळ होळीस फोडू
नको ते जाळुनी काडु.
उमजले सृष्टीचे सांगणे
उन्हात मोहकता देवू
विविधतेत एकता खुलवू
दाहकतेवर पाणी उडवू....
सज्ज होऊ कसण्यास
तयारी उन्हाळी मशागतीची
सरली रब्बी सुगी अन्
रंगउधळत सुरुवात नवपर्वाची...
प्रदिप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव
©®
गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव
©®

रंगीन सुंदर शब्दरचना..!
ReplyDelete