संक्रांत (क्र 1)✍️
| | मकर संक्रांत | |
भोगीचे असती भोग
तरी संक्रांतीचा योग
त्यात क्रिक्रांतीचा संजोग
गोडीत सर्वांना सहयोग.
तिळगुळ घेऊन साजरा
गुलाबी थंडीचा माजरा
जीव जाणावा गोजिरा
उब मिळावी त्यासी जरा.
म्हणून प्रेमात करा
वाढ आपुली जरा
तिळात घालावा गुळ
हुडहुड कमी करा.
गोड आपुला जीव जसा
सखल प्राणी मात्रांचा तसा
देऊनी गोडाई माणसात
उमटावा आपला गोड ठसा.
घ्या संक्रांतीचा वसा
नुसताच साजरा नको करू
त्यातून संदेश वागायचा धरू
ईश्वर कार्य आपण करू.
वागण्यात गोडाई दया उरू
नका देऊ तिला सरू
कास आपण हिच धरू
उभा करू स्वर्गवत कल्पतरु.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️

तिळगुळ घ्या गोड बोला...!छानच
ReplyDeleteछान दादा सूनंदर
ReplyDelete