देवा तूझ्या वाटेवर ✍️

| | देवा तूझ्या वाटेवर | |


देवा तूझ्या वाटेवर 

चाललो भक्ती मार्गानं 

 नाम घेत  मुखी 

चाललो भक्ती  वाटेनं 


सेवा करतं आईबाबांची 

शक्ती मिळते नामाची 

कीर्ती जगी कुटूंबाची 

किंमत त्याच घराची. 


स्वछता दारी वृदावनाची 

पूजा करतोय मनाची 

 संगत संत संगाची 

जोड सदा सद्विचाराची. 


अगाध शक्ती नामाची 

तीच वाट जीवनाची 

सत्य कास मानवाची 

फळे गोड कष्टाची. 


कलियुगी लबाड भारी 

भ्रष्ट भ्रष्टाचार अंगिकारी 

मौज मस्तीत सारी 

खरं उपाशी मरी. 


देवच त्यास तारी 

नामात  तीच भुवरी 

फिरताय चक्र सारी 

उरतील फक्त नामकरी. 


संपतोय काळ आता 

येणार जीव पूजकांचा 

 सुकाळ देव पुरुषांचा 

धनी तोच देव वाटेचा. 




प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव 

©️®️

Comments

  1. छान अंतर्मुख करणारी कविता.

    ReplyDelete
  2. छान आणि वास्तव वादी काव्य

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे