हात तुझा हाती असावा ✍️
प्रेमकविता 💞
| | हात तुझा हाती असावा | |
हात तुझा हाती असावा
सुख दुःखाचा साथी वाटावा
घेऊन सप्तपदी सर्वा समोर
प्रेम बहर असा फुलावा.
सुख दुःखाचा साथी वाटावा
घेऊन सप्तपदी सर्वा समोर
प्रेम बहर असा फुलावा.
राधा कृष्ण सखी नंन्तर
पुढे डंका आपलाच वाजावा
एकरूप जीव असा व्हावा
एकाच ठेचं दुसरा रडावा.
पुढे डंका आपलाच वाजावा
एकरूप जीव असा व्हावा
एकाच ठेचं दुसरा रडावा.
हास्य ऐकास आलं तर
दुसरा प्रसन्न चित्ती खुलावा
शंका कुशंका कधी मनीं
स्पर्श जीवात न जाणवावा.
दुसरा प्रसन्न चित्ती खुलावा
शंका कुशंका कधी मनीं
स्पर्श जीवात न जाणवावा.
जन्मो जन्मी आपलीच कीर्ती
प्रेम ग्रंथ लिहला जावा
कथा कीर्तनात कधी तमाशात
पोवाडा आपलाच सादर व्हावा.
प्रेम ग्रंथ लिहला जावा
कथा कीर्तनात कधी तमाशात
पोवाडा आपलाच सादर व्हावा.
बागेत आपलाच आणाभाका घ्यावा
नामवंन्त मन श्रीमंत असा
गधं प्रेम चौखूर उधळावा
कधी तीळ वाटून खावा.
नामवंन्त मन श्रीमंत असा
गधं प्रेम चौखूर उधळावा
कधी तीळ वाटून खावा.
बंध आपुला कधी न सूटावा
नीती मानसंन्मान प्रेमात असावा
अंत समई पर्यंत जिव्हाळा
विश्वास अविरत मनीं उरावा.
नीती मानसंन्मान प्रेमात असावा
अंत समई पर्यंत जिव्हाळा
विश्वास अविरत मनीं उरावा.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©®

छान लिहिलाय
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteसुंदर विचार
ReplyDelete