प्रेम गीत ✍️

| | प्रेम गीत | |


हृदयात तुझाच  गंध

तुझा लागला छंद 

नेट असतं बंद 

धडधड होते मंद.


सुगंध भिनला अंगात 

पेटली प्रेमाची वात 

विसरणार नाही हयात 

मिळूदे अशीच साथ.


राहतोय असाच रानात 

धरली अशी आडवाट 

तु तर शहरात 

चढून येईल घाट.


बहर आला जीवनात 

जीव रंगला सजनात 

किलबिल पक्षांची जंगलात 

ध्यानस्त वाटतो लोकांत.


विचार तुझेच मनात 

बोल गुंजतात कानात 

शब्द अपूर्ण ओठात 

लाभुदे अशीच  साथ. ©️®️ 



प्रदीप पाटील 

गणपूर ता चोपडा 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे