श्रद्धा हवी डोळस ✍️
| | श्रद्धा हवी डोळस | |
मुखी असावा गजर नामाचा
देव जाणावा मानावा मनाचा
पहावा जीव सृष्टीत ध्यानाने
व्याकुळ जीवास मदत मनाने
ठेवावी श्रद्धा शोधावा माणसात
पूजावा त्यासी सतत देवघरात
नाद सोडावा बुवाबाजी नवसाचा
हात धरावा विज्ञानी सततचा
पाश मोडावा ढोंगी जाहिरातीचा
सर्वी कडे वास देवाचा
पावत नाही चिखल मातीत
राहतो सर्व मनीं जीवात
जाणुनी त्यासी सोडावं पाप
गाडावे वाईट करावा जप
श्रद्धा हवी डोळस
सोडा अंधश्रद्धेचा कळस.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©®

छान ! बोधप्रद काव्य रचना.
ReplyDeleteथँक्स सर 👏👏
Deleteखरय हे, छान लिहिलय
ReplyDeleteथँक्स 👏👏
Deleteखरय हे छान लिहिलय
ReplyDeleteथँक्स 👏👏
Deleteअगदी खरखुर अप्रतिम मांडलय सर...
ReplyDelete