चित्र काव्य ✍️
| | चित्र काव्य | |
एकीकडे हिरवळ सारी
बर्फावर उन्हाची तिरीप
वाऱ्याची त्यावर स्वारी.
सांज खुलली बर्फावर
नजर खिळली हिरवळीवर
बाष्प उधळलं दरीवर
स्वर्ग अवतार पृथ्वीवर.
प्रसन्न भाव मनावर
घेऊ त्यातून सार
जगु आनंदी दिवसभर
अंगीकार करू जीवनभर.
जोपासू सृष्टी सारी
तीच आपल्याला तारी
निसर्ग मानव कल्याणकारी
जीव जगतोय भुवरी.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©®

मस्त....!
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
Deleteखूपच छान
Deleteमन प्रसन्न करणारी कविता.
ReplyDelete