पाऊस ✍️
| | पाऊस | |
गर्दी केली ढगांनी
कडकडाट केला विजांनी
चक्र फिरवलं वाऱ्यांनी
सळसळाट केला वृक्षांनी....
तिफण धरली शेतकऱ्यांनी
किलकिलाट केला पाखरांनी
सूचना दिली त्यांनी
सुरक्षितता अंगिकारली सार्यांनी...
कडकडाट केला विजांनी
चक्र फिरवलं वाऱ्यांनी
सळसळाट केला वृक्षांनी....
तिफण धरली शेतकऱ्यांनी
किलकिलाट केला पाखरांनी
सूचना दिली त्यांनी
सुरक्षितता अंगिकारली सार्यांनी...
गधं सुटला आल्हाद
पसरला धर्तीचा सुवास
बीजांना लागला ध्यास
लागली उत्सुकता अंकुरण्यास....
पावसाची किमया भारी
साऱ्यांना देते उभारी
आस नवनिर्माण सर्वांना
जीवसृष्टी खुलली सारी....
प्रदीप पाटील
गणपूर (जळगाव )
©®

Comments
Post a Comment