पूर्वीचे दिवस ✍️
| | पूर्वीचे दिवस | |
दिवस होते
छान सुंदर सुगीचे
किलबिल पक्षाचे
रानात
वनराई भोवती
मनमोहक दिसती बनात
आनंद गगनात
मनात
पाणी जागोजागी
झुळझुळ वाहती नदीत
डोंगर खोरीत
अरण्यात
झाडी घनदाट
पशु पक्षी जीवसृष्टी
खुशीत सृष्टी
सुरेख
घोडा बैलगाडी
गाय म्हशी वासरू
उडती पाखरू
मळ्यात
मोट पखाल
पाणी वाहती घरोघरी
शुद्ध दारोदारी
आंघोळ
घट्या ओढीत
दळती दळणं आई
कुटुंब खाई
भाकर
कंदील बत्ती
दिवाबत्ती प्रकाशती
चंद्रसुर्य भासती
सुरेख
माणसं प्रेमी
जीव एकमेकांसाठी
उभी पाठी
राहती
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©️®️

👌👌👌मस्त
ReplyDeleteजून्या आठवनिना ऊजाळा भेटला सर धन्यवाद 🙏 खूपच छान
ReplyDeleteअति सुंदर
ReplyDeleteबालपणीच्या रम्य आठवणी,सुंदर वर्णन
ReplyDelete